रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका कधी सुरु होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे काही भाग प्रसारितही झाले होते. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आधीच्या पर्वाप्रमाणेच या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे शुटिंग देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु होते. मात्र याच सुमारास करोनाची दुसरी लाट आल्याने सर्व शुटिंग बंद करण्यात आली. आणि या मालिकेच्या शुटिंगलाही ब्रेक लागला. इतर मालिकांचं शुटिंग परराज्यात सुरु करण्यात आलं पण ती गोष्ट रात्रीस खेळ चाले मालिकेसंदर्भात करणं शक्य नव्हतं. याचं कारणं म्हणजे मालिकेतला अण्णा नाईंकांचा वाडा. रात्रीस खेळ चाले मालिकेतील इतर पात्रांप्रमाणे मालिकेतील वाडा हे देखील महत्त्वाचे पात्र असल्याने तो बदल करणं शक्य नव्हतं. पण त्यानंतर राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर सगळ्या मालिकांची घरवापसी झाली आणि त्याचं टेलिकास्ट सुरुही झालं. पण रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा सुरु झालीच नाही. त्यामुळे ही मालिका पुन्हा पहायला मिळणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होता. याचं उत्तर अखेर पांडू म्हणजे प्रल्हाद कुरतडकर यांनं दिलय... या मालिकेचं शुटिंग लवकरच सुरु करण्यात येत असल्याचं प्रल्हादने सांगितलय..
#RatrisKhelChale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber